बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेने संताप व्यक्त केला जातोय. स्वारगेट बस स्थानक परिसराच्या आवारात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अत्याचार करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर धक्कादायक म्हणजे याच बंद शिवशाही बसमध्ये मोठ्या संख्येने महिलांच्या साड्या आणि काँडम्स आढळून आले. दरम्यान आता या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ही कोठडी सुनावण्यात आलीय. दरम्यान यानंतर सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलोंनी आपापली बाजू मांडलीय.
हेही वाचा: Kiara Advani Pregnant: कियारा- सिद्धार्थच्या आयुष्यात येणार गोड गिफ्ट
काय म्हणाले आरोपीचे वकील?
आरोपीने जबरदस्ती केली नाही
दोघांच्या संमतीने झाले
गुन्हे सिद्ध झालेले नाहीत
2 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी
काय म्हणाले सरकारी वकील?
आरोपीवर 6 गुन्हे दाखल
आरोपीकडून 2 वेळा लैंगिक अत्याचार
5 गुन्ह्यात महिला तक्रारदार
14 दिवसांची पोलीस कोठडी हवी
हेही वाचा: Instant Rice Recipes तांदळापासून बनणाऱ्या झटपट रेसिपी
पुणे कोर्टात नेमकं काय घडलं; सरकारी वकील युक्तिवाद
आरोपीवर दाखल असलेल्या 6 गुन्ह्यापैकी 5 गुन्ह्यात तक्रारदार महिला आहेत त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होते आहे.या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपचा आहे.आरोपी सराईत असल्याने त्याने यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केलेले आहे का हे तपसायचे आहे.त्याचबरोबर आरोपीला मदत करणारे आणखी काहिजण त्याच्यासोबत आहेत का हे तपासायचे आहे.सखोल तपासासाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे.सरकारी वकिलांनीही याआधी गुन्ह्याची आणि आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती दिली.आतापर्यंत या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे तसेच आणखी काही मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत.आरोपी वकील युक्तिवादआरोपीच्या वकिलांकडून 2 दिवसाच्या पोलिस कोठडीची मागणी चेहरा tv वर दाखवला गेला पोलिसांनी सोशल मीडिया ट्रायल केलं एवढा गंभीर गुन्हा नाही मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली कुठलाही अत्याचार झाला नाही दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले.