महाशिवरात्री निमित्ताने श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. देशभरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिशय पुरातन आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या वृद्धेश्वर शिव मंदिरामध्ये दर्शनासाठी सकाळपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगरराच्या कुशीत असलेल्या या पुरातन मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग आहे या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातीलच नाहीतर राज्यभरातून भाविक येतात.
नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांनी याच शिवलींगा जवळ महायज्ञ केला होता. या यज्ञाला साठी 33 कोटी देव गर्भगिरी डोंगरावर अवतरले आणि यज्ञामध्ये सहभागी झाले तेव्हापासून या शिवमंदिराला वृद्धेश्वर किंवा म्हातार देव असं म्हटलं जातं अशी आख्यायिका सांगितली जाते. महाशिवरात्रि आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. महा कुंभच्या पर्वणीच्या काळातच महाशिवरात्री आल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या मंदिरात आल्यामुळे एक ऊर्जा मिळते आणि आत्मिक आनंद मिळतो अशी भावना या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: Pune: धक्कादायक! शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचाराचा थरार
श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिराचा इतिहास:
गुरू मच्छीद्रनाथांनी सुवर्ण डोंगर कुबेराला अर्पण करत वृद्धेश्वर येथे ३३ कोटी देव साधू, संत-महंत. ऋषीमुनी आदी सर्व देवदिकांना महाप्रसाद देण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार महाप्रसाद भंडारा होऊन महादेव-पार्वतीने ब्राम्हण वेषात प्रकट होऊन पंगती वाढल्या. देवराईपर्यंत देवाच्या रांगा जेवायला बसल्या म्हणून तेथील स्थानाला देवराई हे नाव पडले देवाच्या पंगतीत महादेव वृद्ध म्हताऱ्याचे रूप घेऊन जेवत होते. सर्व देवानी विनंती केली की, हे महादेवा आता हे रूप घेतले, आम्हाला याच रूपात दर्शन दिले; तुंम्ही याच रूपात विश्व कल्याणासाठी येथेच राहावे, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. नाथांनी व सर्व देवांनी विंनती केल्यावर महादेव वृद्ध रूपात राहीले म्हणून त्यांना म्हतारदेव (वृद्धेश्र्वर) म्हणू लागले. वृद्धेश्वरचे शिवलिंग स्वयंभू असून शिवलिंगाजवळ १२ ज्योतिर्लिंग गुप्त रूपात असल्याचे म्हटले जाते.
हेही वाचा: Navi Mumbai: इमॅजिका पार्कमध्ये शाळेच्या सहलीदरम्यान 8 वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
महाशिवरात्रीला हे शिवलिंग वृद्धींगत (वाढते) होते, असे म्हटले जाते. राजा रामदेवराय यांनी अकराव्या शतकात मंदिराला मोठी पितळी घंटा अर्पण केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. संत ज्ञानेश्वर, साईबाबा यासारख्या महान संतांनी येथे भेट दिल्याचा उल्लेख विविध धर्मग्रंथात आहे. 'साद देती हिमशिखरे' या हिमालयातील प्रवास वर्णनावर अधारित ग्रंथामध्ये या स्थानाचे महात्म्य दिलेले आहे.