२२ सप्टेंबर, २०२४, सिंधुदुर्ग : 'शिवाजी महाराज पुतळा उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. अडीच कोटी पुतळ्यासाठी मंजूर केले होते मात्र, त्यातील फक्त २५ लाखचं जयदीप आपटेला दिले. बाकीचे पैसे नारायण राणेंच्या निवडणुकीसाठी जे पैसे वाटप झाले त्यासाठी वापरण्यात आले आहेत', असा आरोप शिउबाठा आमदार वैभव नाईक यांच्याकडून करण्यात आला आहे.
'आम्ही भ्रष्टाचार झाला हे सांगत असल्यामुळे आम्हीच पुतळा पाडला असा आरोप करून आठवडाभरात पुरावे देतो म्हणून ज्यांनी सांगितलं ते आरोप करणारे आता कुठे गेले?' असा सवालही वैभव नाईक यांनी निलेश राणेंना विचारला.
यावर प्रत्युत्तर देताना 'वैभव नाईक यांच्याकडे पुरावा असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे जावं. त्यांचा वेळ जात नाही म्हणून आरोप करत बसले आहेत. पुतळा पाडण्यात वैभव नाईक यांचाच हात होता म्हणून ते आता असे आरोप करत आहेत', असं निलेश राणे म्हणाले आहेत.