Saturday, January 18, 2025 07:55:04 AM

Praful Patel vs Maharashtra Congress
काँग्रेसची स्थिती हरियाणाप्रमाणे महाराष्ट्राच्या निवडणुकीत होईल

काँग्रेसने आपली रणनीती आणि प्रचार पद्धती सुधारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्यथा पराभवाची पुनरावृत्ती होऊ शकते.

काँग्रेसची स्थिती हरियाणाप्रमाणे महाराष्ट्राच्या निवडणुकीत होईल
manunile
manojteli


मुंबई : प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे की, अतिआत्मविश्वासामुळे काँग्रेसला महाराष्ट्र निवडणुकीत हरियाणासारख्या पराभवाला समोरे जावे लागेल. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, "काँग्रेस, हरियाणाच्या पराभवाचे उदाहरण ताजे असताना, असे दिसते की काँग्रेस महाराष्ट्रात आघाडी मिळविण्यासाठी हालचाल सुरू आहे. मात्र, विरोधकांना कमजोर समजल्याने अनपेक्षित आणि प्रतिकूल परिणाम होऊ शकतात, हे काँग्रेसने विसरू नये."

प्रफुल्ल पटेल यांचा हा इशारा काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभा करतो, त्यांनी याआधीच्या निवडणुकांमध्ये झालेल्या काँग्रेसला आलेल्या अपयशाचा संदर्भच दिला आहे. काँग्रेसने आपली रणनीती आणि प्रचार पद्धती सुधारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, अन्यथा पराभवाची पुनरावृत्ती होऊ शकते. असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


सम्बन्धित सामग्री