१२ जुलै,२०२४ पंढरपूर : सध्या पंढरपुरची आषाढी वारी सुरु आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघले आहेत. या दरम्यान, दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकाशी सुरक्षारक्षकाने हुज्जत घातली आहे. पंढरपुरच्या श्री विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी उभ्या असलेल्या एका महिला भाविकाशी सुरक्षारक्षकाने हुज्जत घातली आहे. तसेच, त्या महिलेला यावेळेस सुरक्षारक्षकाने धक्काबुक्कीही केली आहे.
या घटनेनंतर दर्शन रांगेतील भाविकांप्रती मंदिर सुरक्षा कर्मचाऱ्यांचा असणारा उद्धट आणि उर्मटपणा आता समोर आला आहे. घडलेला प्रकार पाहता प्रशासनाकडून सुरक्षारक्षकांना सूचना आणि मार्गदर्शन होणं गरजेचं आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत आता सुरक्षारक्षक यांच्याबद्दल स्थानिकांसह, भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे.