औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभरात वातावरण तापल्यानंतर सोमवारी, 17 मार्च 2025 रोजी नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराची घटना घडली. त्यामुळे, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. 'नागपूरमधील हिंसाचाराला सरकारच जबाबदार आहे', असा आरोप विरोधकांनी केला आहे. अशातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणेंना पुढील काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिले आहे.
मंत्री नितेश राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य:
मागील काही दिवसांपासून मंत्री नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे, 'मंत्री नितेश राणे यांनी मागील काही काळात केलेली वक्तव्यचं या सर्व हिंसाचाराला जबाबदार आहेत', असे विरोधकांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्रींचे नितेश राणेंना मौनव्रत ठेवण्याचे आदेश:
मंगळवार, 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळपासूनच औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय खलबत्त सुरू आहे. अशातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना दालनात बोलवून पुढचे काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी, मुख्यमंत्र्यांच्या दालनात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नितेश राणे यांनी विधानसभा अध्यक्षांची देखील भेट घेतली.
विधानसभा अध्यक्षांच्या भेटीत नेमकं काय ठरलं?
विधानसभा अध्यक्षांच्या भेटीत नेमकं काय ठरलं, काय चर्चा झाली, याची माहिती अध्यात्प नाही मिळाली. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या शीर्षनेतृत्वाने पुढील काही दिवस नितेश राणे यांना शांत राहण्याची सूचना दिले आहे'.
नागपूरमध्ये झाला हिंसाचार:
सोमवारी रात्री, नागपूरमधील काही भागात हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. यामध्ये अनेक पोलिस गंभीर जखमी झाले होते. इतकेच नाही तर, गुन्हेगारांनी गाड्यांची तोडफोड करून त्यांना पेटवले. त्यामुळे, सोमवारपासून नागपूरमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरून वाद:
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात 'औरंगजेबाची कबर हटवा' अशी मागणी होत आहे. राज्यभरात मोठ्या संख्येने आंदोलन होत आहे. अशातच, खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीजवळ कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.