Wednesday, April 02, 2025 02:18:03 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केलाय. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून देण्यावरुन बाळासाहेबांच्या खोलीत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या कथित वचनावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी भाष्य केलंय. निकालानंतर ठाकरे माझा फोनही घेत नव्हते, त्यांचं शरद पवारांसोबत आधीच ठरलं होतं, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. 

हेही वाचा: Delhi Election Results 2025: आपच्या पराभवाची कारणं कोणती?

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? 

लोकसभा निवडणुका होत्या, आम्ही युतीसाठी बसलो. एके रात्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, की देवेंद्रजी, आम्हाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद हवं आहे. मी तुमच्या वरिष्ठांच्याही कानावर ही गोष्ट घातली आहे. अंतिम निर्णय आज घेऊन टाकू. रात्रीचा 1 वाजला होता. मी म्हटलं, की मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. आमचे पार्लमेंट्री बोर्ड निर्णय घेते. मी अमित शहांशी बोलतो. रात्री एक वाजताच मी शाहांना फोन केला, त्यांना सांगितलं की जागावाटपावर तर आमचा अंतिम निर्णय झालाय, पण त्यांचं म्हणणं आहे की अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद हवं, असं फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: Delhi Election Results 2025: आपच्या प्रचारात इंडिया आघाडीच्या नेत्यांची पाठ

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल हा मोठा गौप्यस्फोट केला असून अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून देण्यावरुन बाळासाहेबांच्या खोलीत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या कथित वचनावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी भाष्य केलंय. निकालानंतर ठाकरे माझा फोनही घेत नव्हते, त्यांचं शरद पवारांसोबत आधीच ठरलं होतं, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय.  


सम्बन्धित सामग्री