छत्रपती संभाजीनगर : आज (9 जानेवारी 2025) संतोष देशमुख यांची हत्या होऊन १ महिना पूर्ण झाला आहे. संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने लढा दिला. ठीकठिकाणी मोर्चेदेखील झाले. पण न्यायासाठी असणाऱ्या या लढ्याला अद्यापही यश आले नाही .
आज (9 जानेवारी 2025) छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये संतोष देशमुखयांच्या हत्या प्रकरणी भव्य आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग असेल. मनोज जरांगे, सुरेश धस आणि बजरंग सोनवणे हे प्रमुख लोक प्रतिनिधी या मोर्चात सहभागी होणार आहेत. या तिन्ही नेत्यांनी या पूर्वीदेखील संतोष देशमुख यांच्यासाठी झालेल्या मोर्चांमध्ये उपस्थित होते. राजकीय नेत्यांसोबत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखदेखील या मोर्चातून न्यायासाठी लढा देणार आहेत.
असा आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम
9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून करण्यात आला.
सरपंचाचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा
11 डिसेंबरला आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन वाल्मीक कराडवर आरोप केले
11 डिसेंबरला धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, अजित पवार गटाचा केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेवर केज पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला
13 डिसेंबरला हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.
14 डिसेंबरला केज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं.
19 डिसेंबरला सरपंच देशमुखांचा शवविच्छेदनाचा अहवाल आला
त्यांच्या अंगावर 56 जखमा आढळून आल्या आणि मारहाणीत मृत्यू झाल्याचं स्पष्ट
31 डिसेंबरला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण गेला, कोर्टानं 14 दिवसांची कोठडी सुनावली
4 जानेवारीला फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेंना पुण्यातून अटक करण्यात आली
संतोष देशमुखांचं लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणेला कल्याणमधून अटक करण्यात आली