Thursday, November 21, 2024 11:53:50 AM

Police Case
'टपाली मतपत्रिका व्हायरल करणं भोवलं'

मतदान केलेल्या टपाली मतपत्रिकेचा फोटो व्हायरल करणे मुंबई पोलीस दलातील एका शिपायाला भोवले आहे.

टपाली मतपत्रिका व्हायरल करणं भोवलं

आष्टी : मतदान केलेल्या टपाली मतपत्रिकेचा फोटो व्हायरल करणे मुंबई पोलीस दलातील एका शिपायाला भोवले आहे. पोलीस शिपायाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

नियमानुसार मतदान हे गुप्त असते. अत्यावश्यक कामामुळे मतदानाच्या दिवशी मतदारसंघात गैरहजर राहणार असलेल्या नागरिकांना टपाली मतदानाचा पर्याय उपलब्ध असतो. अनेकदा निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस टपाली मतदान करतात. हे मतदान केल्यानंतर मतपत्रिका सील करुन टपालाद्वारे पाठवायचे असतात. पण आष्टी विधानसभा मतदार संघात मतदार असलेल्या पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे यांनी स्वतःच्या मतदान केलेल्या टपाली मतपत्रिकेचा फोटो काढून समाजमाध्यमात व्हायरल केला. या प्रकरणात पोलीस शिपायाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

                 

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo