Friday, January 31, 2025 03:10:52 AM

Burqa Exam Entry Controversy
मुस्लिम विद्यार्थ्यांचा बुरख्यावरून संताप: "आम्ही कॉपीसाठी नाही, सुरक्षेसाठी बुरखा घालतो!"

बुरखा बंदी मागणीवर विद्यार्थ्यांची तीव्र प्रतिक्रिया: &quotधर्म आणि परंपरेशी छेडछाड नको!&quot

मुस्लिम विद्यार्थ्यांचा बुरख्यावरून संताप quotआम्ही कॉपीसाठी नाही सुरक्षेसाठी बुरखा घालतोquot

आमदार रईस शेख यांचा सल्ला: "या मागणीला प्रसिद्धी देऊ नका!"
मुंबई – राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर मस्त्य विकास मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना एक पत्र लिहून परीक्षा केंद्रांमध्ये बुरखा परिधान करून विद्यार्थिनींना प्रवेश नाकारावा, अशी मागणी केली आहे. परीक्षांदरम्यान कॉपीचे प्रमाण वाढू शकते, अशी शक्यता वर्तवत राणे यांनी ही मागणी केली. मात्र, या मागणीला मुस्लिम विद्यार्थिनींनी तीव्र विरोध दर्शवला असून, "आम्ही आमच्या सुरक्षेसाठी बुरखा घालतो, परीक्षेत कॉपी करण्यासाठी नाही," असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिला आहे.

👉👉 हे देखील वाचा : आता मुख्यमंत्र्यांवरही हीच वेळ आलीय...असे का म्हणाले नाना पटोले?

मुस्लिम विद्यार्थिनींच्या मते, "बुरखा हा आमच्या धर्माचा आणि परंपरेचा एक भाग आहे. आम्ही तो परीक्षेसाठी नव्हे, तर सुरक्षेसाठी वापरतो. जर सरकारला शंका असेल, तर परीक्षा केंद्रांवर महिला कर्मचारी नियुक्त करून तपासणी करावी. मात्र, बुरखा काढण्याचा आग्रह चुकीचा आहे."

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख म्हणाले, "ही मागणी संविधानाच्या विरोधात आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी चुकीची आहे. नितेश राणे यांचा हेतू सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे अशा वक्तव्यांना प्रसिद्धी देण्याची गरज नाही. सरकार जर काही निर्णय घेईल, तेव्हा आम्ही त्यावर प्रतिक्रिया देऊ."

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

दरम्यान, परीक्षेच्या सुरक्षेच्या कारणास्तव सरकार कोणते निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, बुरख्यावरून पुन्हा एकदा धार्मिक आणि सामाजिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री