Thursday, March 13, 2025 09:53:36 PM

Satish Bhosale : खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझरची धडक, वन विभागाची मोठी कारवाई!

सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या शिरूर कासार गावातील अनधिकृत घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून हे घर उभारण्यात आले होते.

satish bhosale  खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझरची धडक वन विभागाची मोठी कारवाई

बीड : सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या शिरूर कासार गावातील अनधिकृत घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून हे घर उभारण्यात आले होते. यापूर्वीच वनविभागाने नोटीस बजावली होती, मात्र दिलेल्या 48 तासांत कोणताही प्रतिसाद न आल्याने कारवाई करण्यात आली.सतीश भोसले हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असून, बीड पोलिसांनी प्रयागराज येथून त्याला अटक केली आहे. तो बीडला पोहोचण्याआधीच वनविभागाने त्याच्या घरावर कारवाई केली.

हेही वाचा: Satish Bhosle : खोक्या भोसलेचा ताबा घेतला, प्रयागराज कोर्टात हजर करणार, बीडमधून हद्दपार!

वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून वनविभागाने सतीश भोसलेच्या घरावर छापा टाकला असता, धारदार शस्त्रं, जाळी, वाघूर आणि प्राण्यांचे अवशेष पोलिसांना आढळून आले. यावरून शेकडो हरणे, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हरणाच्या पार्ट्यांचे अवशेष देखील ताब्यात घेण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यातील बावी गावाच्या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात हरणांचा कळप आढळतो. मात्र, खोक्या भोसले आणि त्याच्या टोळीने या कळपाला लक्ष्य केले. ढाकणे यांच्या शिवारातील डोंगरामध्ये हरणांना अन्न व पाणी शोधण्यासाठी येणाऱ्या ठिकाणी जाळी लावून त्यांची शिकार केली जात असल्याचे वनविभागाच्या तपासात समोर आले आहे.
 


सम्बन्धित सामग्री