Saturday, December 21, 2024 06:15:01 PM

Sambhajinagar
संभाजीनगरमध्ये लाडक्या बहीणींची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरून देण्यासाठी पैसे उकळले जात असल्याचे समोर आले आहे.

संभाजीनगरमध्ये लाडक्या बहीणींची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरून देण्यासाठी पैसे उकळले जात असल्याचे समोर आले आहे. पैठणच्या पारूंडी येथे हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे अर्ज भरण्यासाठी सरकारकडून ५० रुपये शुल्क मिळत असताना देखील पांरूडी येथील ग्राहक सेवा केंद्र चालकांकडून मुख्यमंत्र्यांच्या बहिणींची फसवणूक केली जात आहे. या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo