Beed District Collector Car Seized
Edited Image
Beed District Collector Car Seized: गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा (Beed District) चांगलाचं चर्चेत आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्याचं नाव देशभरात गाजलं. पण आता पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला आहे. बीड येथील न्यायालयाने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त (Beed Collector Car Seized) करण्याचे आदेश दिले. यानंतर पुन्हा एकदा राज्यात बीडची चर्चा सुरू झाली. खरंतर हे प्रकरण शेतकऱ्यांशी संबंधित आहे. असं नेमकं काय घडलं की, चक्क कोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले. चला तर मग नेमकं प्रकरण काय आहे? ते जाणून घेऊयात...
काय आहे नेमकं प्रकरण?
बीडमधील माजलगाव येथील न्यायालयाने (Majalgaon Court) सिंचन प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या तीन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले. 1998 मध्ये वडवणी तहसीलमधील शेतकरी शिवाजी टोगे, संतोष टोगे आणि बाबू मोगे यांच्याकडून सिंचन प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली होती. या शेतकऱ्यांनी माजलगाव न्यायालयात धाव घेतली होती. या तीन शेतकऱ्यांनी त्यांना देण्यात आलेली भरपाई अपुरी असल्याचा दावा केला होता.
हेही वाचा - पुण्यात मांजरींचा धुमाकूळ
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी कलेक्टरची गाडी जप्त -
दरम्यान, न्यायालयाने 29 ऑक्टोबर 2015 च्या आदेशात भरपाई वाढवली होती. प्रशासनाने अद्याप एकूण 29.50 लाख रुपये भरणे बाकी असताना, रकमेचे केवळ अंशतः वितरण करण्यात आले. त्यामुळे आज न्यायालयाने ही रक्कम वसूल करण्यासाठी कलेक्टरची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा - Shivsena : शिवसेनेचे सर्व खासदार प्रयागराजला जाणार
गाडी जप्त केल्यानंतर, तिच्या लिलावासाठी वॉरंट जारी करण्यात आले आहे. तथापी, पीडित शेतकऱ्यांची वकिलाने सांगितले की, आम्ही वॉरंट घेऊन तिथे गेलो तेव्हा कलेक्टरने आम्हाला गाडीच्या चाव्या दिल्या. बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'हा विषय माझ्याशी संबंधित नसल्याने मी त्यावर भाष्य करू शकत नाही.'