Saturday, April 12, 2025 05:29:45 PM

महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर

दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील एकूण 49  व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील एकूण 49  व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.

हेही वाचा : Padma Awards 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2024’ शनिवारी जाहीर झाले. महाराष्ट्रातील  शशिकांत रामकृष्ण गजबे  यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार  दादाराव गोविंदराव पवार, ज्ञानेश्वर मुकुंदराव भेदोडकर यांना जाहीर करण्यात आले.

देशातील 49 नागरिकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यातील 17  नागरिकांना ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’  जाहीर करण्यात आले. यामध्ये पाच व्यक्तींना मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येतील. देशातील नऊ जणांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’  जाहीर झाले असून एका व्यक्तींस मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ एकूण 23 जणांना जाहीर झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

या पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि  रोख रकम असे आहे. हे पुरस्कार संबंधित राज्य शासनामार्फत नंतर प्रदान करण्यात येतील.


सम्बन्धित सामग्री