Saturday, October 05, 2024 06:50:13 PM

Artists above 50 years will get stipend
५० वर्षांवरील कलावंतांना मिळणार मानधन

एप्रिल २०२४ पासून ५० वर्षावरील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांना सरसकट ५ हजार रुपये एवढे मानधन देण्यात येत आहे.

५० वर्षांवरील कलावंतांना मिळणार मानधन 
stipened to aged artist

२३ जुलै, २०२४ मुंबई : एप्रिल २०२४ पासून ५० वर्षावरील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांना सरसकट ५ हजार रुपये एवढे मानधन देण्यात येत आहे. राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक आणि कलावंत योजनेअंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांना याचा लाभ घेता येणार आहे. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारेच मानधन अदा करण्याबाबत राज्य शासनाचे धोरण आहे. त्यानुसार, राज्यातील या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी ३१ जुलै २०२४ पर्यंत आधार पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.


सम्बन्धित सामग्री