Saturday, February 01, 2025 01:31:46 AM

An eye-pleasing view of the Moon-Saturn-Venus conj
रात्रीच्या प्रारंभी पश्चिमेस चंद्र-शनी-शुक्र युतीचे साध्या डोळ्यानी मनोहारी दर्शन

शनिवार 1 फेब्रुवारी रोजी सायं. सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर चंद्र-शनी युती दिसेल.तसेच रविवार 2 फेब्रुवारी रोजी सायं. सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितीजावर चंद्र-शुक्र युती दिसेल.

रात्रीच्या प्रारंभी पश्चिमेस चंद्र-शनी-शुक्र युतीचे साध्या डोळ्यानी मनोहारी दर्शन

मुंबई:  शनिवार 1 फेब्रुवारी रोजी सायं. सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर चंद्र-शनी युती दिसेल.तसेच रविवार 2 फेब्रुवारी रोजी सायं. सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितीजावर चंद्र-शुक्र युती दिसेल. सोमवार 10 फेब्रुवारी रोजी मध्य आकाशात चंद्र-मंगळ युती दिसेल. साध्या डोळ्यानी या युत्या पाहता येतील. शनी ग्रह अंधुक दिसेल. मंगळ लालसर रंगाचा दिसेल.गुरु-शुक्र तेजस्वी दिसतील असे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

हेही वाचा :  किन्नर आखाड्याने केली मोठी कारवाई; ममता कुलकर्णीला पदावरून हटवले, कारण काय?
 

सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशात मंगळ, गुरू, शुक्र आणि शनी हे चार ग्रह अगदी साध्या डोळ्यांनी दिसत असल्याचे पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना श्री.दा.कृ.सोमण म्हणाले की रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात शुक्र-शनी दर्शन देतील. गुरू ग्रह रोहिणी नक्षत्रात मध्यआकाशात दिसेल तर पूर्व आकाशात पुनर्वसू नक्षत्रात लालसर रंगात मंगळ ग्रह दर्शन देईल. हे चार ग्रह साध्या डोळ्यानी सर्वांना पुढील काही दिवस रोज पाहता येतील. युरेनस आणि नेपच्यून साध्या डोळ्यानी दिसणार नाहीत.

हेही वाचा : पुण्यात तीन दिवसीय विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

खगोलप्रेमींसाठी चार ग्रह एकाचवेळी दिसण्याची ही पर्वणी आहे. तुमच्याजवळ जर दुर्बीण असेल तर शुक्राच्या कला, शनीची वलये आणि गुरू ग्रहाच्या पंचाण्णव चंद्रांपैकी चार चंद्र दुर्बीणीतून निरिक्षण करता येतील. सध्या अनेक शाळांतून आणि खगोल संस्थांमधून हे ग्रह दाखविले जात आहेत. त्यामुळे सर्व खगोलप्रेमी मोठ्या उत्साहात आकाश निरिक्षण कार्यक्रमात सहभागी होत आहेत असेही खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


 


सम्बन्धित सामग्री