Thursday, September 19, 2024 09:04:43 AM

An attempt to extinguish a mine
बारामतीत खाण बुजवण्याचा प्रयत्न

झारगडवाडी गावच्या मध्यभागी गावठाण हद्दीत असलेली ४० गुंठे खाण गाव पुढारी आणि खाणी शेजारी असलेल्या ग्रामस्थांकडून स्वतःच्या फायद्यासाठी बुजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

बारामतीत खाण बुजवण्याचा प्रयत्न 
BRMT MINE

११ ऑगस्ट, २०२४, बारामती : झारगडवाडी गावच्या मध्यभागी गावठाण हद्दीत असलेली ४० गुंठे खाण गाव पुढारी आणि खाणी शेजारी असलेल्या ग्रामस्थांकडून स्वतःच्या फायद्यासाठी बुजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गाव पुढाऱ्याच्या सहकार्याने खाणी शेजारी जागा असणाऱ्या व्यक्तीने जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने गावात असलेल्या गायरान क्षेत्रातील मुरूम उत्खनन केले. याबाबत महसूल विभाग आणि ग्रामपंचायतीला कुठलीही कल्पना दिलेली नव्हती. झारगडवाडी ग्रामपंचायत गावठाणच्या हद्दीत असलेली खाण मनगटशाहीने बुजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याची माहिती गावचे सरपंच अजित बोरकर यांना मिळताच त्यांनी गावठाण क्षेत्रातील असलेली खाण मुरूम टाकून बुजवण्याचे काम बंद पाडले. तसेच, याबाबत बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांना फोन करून बेकायदा गायरान क्षेत्रातील मुरूम उत्खनन करणाऱ्या जेसीबी मशीन मालक आणि ट्रॅक्टर चालक मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

झारगडवाडी गावात गायरान क्षेत्रात बेकायदा मुरूम उत्खनन केलं जात असल्याची माहिती बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांना फोनद्वारे देण्यात आली आहे. पुरावा म्हणून त्याबाबतचे फोटो आणि व्हिडिओही पाठवण्यात आले आहेत. यामुळे आता जेसीबी मशीन चालक, मालक तसेच ट्रॅक्टर चालक, मालक यांच्यावर बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री