Wednesday, December 11, 2024 11:40:56 PM

Allegations of EVM hacking
ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; सायबर पोलीसांची कारवाई

हॅकरच्या व्हिडिओने सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवली आहे.

ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ सायबर पोलीसांची कारवाई

मुंबई:  महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर एका हॅकरच्या व्हिडिओने सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित हॅकरने ईव्हीएम हॅक करण्याची क्षमता असल्याचा दावा केला आहे.

ही चित्रफीत सोशल मीडियावर, विशेषतः एक्स (ट्विटर) माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायर झाली आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी ही व्हिडिओ क्लिप शेअर करत ईव्हीएमच्या कार्यक्षमतेबाबत शंका व्यक्त केली आहे. त्यावर सत्ताधारी पक्षाने जोरदार प्रत्युत्तर देत ईव्हीएम पूर्णतः सुरक्षित असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

दरम्यान, ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या या व्हिडिओविषयी गंभीर दखल घेत मुंबईतील सायबर पोलिसांनी त्वरित कारवाई केली आहे. माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधित हॅकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून व्हिडिओच्या सत्यतेची सखोल चौकशी सुरू आहे.

ईव्हीएम हॅकिंगच्या या दाव्यामुळे निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासार्हतेबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक नेत्यांनी ईव्हीएमच्या सुरक्षिततेसाठी अधिक पारदर्शक प्रक्रिया राबवण्याची मागणी केली आहे.

ही घटना निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेसाठी मोठे आव्हान ठरू शकते. सायबर पोलिसांनी याबाबत योग्य ती कारवाई करून अफवा आणि चुकीची माहिती पसरावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरांवर होत आहे .


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo