Saturday, January 18, 2025 05:29:02 PM

Devendra Fadnavis
सर्व दोषींना फासावर लटकवणार; फडणवीसांचा इशारा

संतोष देशमुख यांना न्याय देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

सर्व दोषींना फासावर लटकवणार फडणवीसांचा इशारा

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात चर्चेत आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आहे. त्यानंतर सर्व नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. संतोष देशमुख यांना न्याय देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : Walmik Karad : वाल्मिक कराड पोलिसांना शरण

 

'सर्व दोषींना फासावर लटकवणार'

संतोष देशमुख प्रकरणात कडक कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच गुंडांचं राज्य चालू देणार नाही. पुराव्यांच्या आधारे कारवाई करणार आणि सर्व दोषींना फासावर लटकवणार असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.

 

वाल्मिक कराडची संपत्ती जप्त झाली पाहिजे - धस

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर सातत्याने एक नाव चर्चेत राहिले ते म्हणजे आमदार सुरेश धस. धस यांनी देशमुख प्रकरणात आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करत राहिले. या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कराडला शरण यायला पोलिसांनी भाग पाडलं असल्याचे आमदार धस यांनी म्हटले. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत. वाल्मिक कराडची संपत्ती जप्त झाली पाहिजे असे धस यांनी म्हटले.  

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

'दोषी नव्हता तर फरार का होता?'

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर देखील सरपंच हत्या प्रकरणात सातत्याने चर्चेत राहिले. देशमुखांच्या आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दोषी नव्हता तर फरार का होता? असा आरोप आमदार क्षीरसागर यांनी केला आहे. कठोर कारवाईचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. कराडवर 302 चा गुन्हा दाखल करा. तसेच चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. चौकशी थांबवण्यासाठी पोलिसांना फोन आले. तसेच हत्येतील मास्टरमाईंड समोर आला पाहिजे असे क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

'कराडची शरणागती हा रचलेला डाव'

देशमुख हत्येप्रकरणी संभाजीराजे यांनी भाष्य केले आहे. बीडमधील मूक मोर्चाला देखील ते उपस्थित होते. वाल्मिक कराडवर मोक्का लावा. तर खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिकला अटक नको. कराडची शरणागती हा रचलेला डाव असल्याचे खळबळजनक वक्तव्य छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.


सम्बन्धित सामग्री