Saturday, March 01, 2025 04:34:43 AM

पुण्यानंतर आता लातूरमध्ये बलात्काराची घटना! 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक

लातूरमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे दृश्यकृत्य करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पुण्यानंतर आता लातूरमध्ये बलात्काराची घटना 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आरोपीला अटक
Latur Minor Girl Rape Case
Edited Image

Latur Minor Girl Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात मंगळवारी एका तरुणीवर जुन्या शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आता लातूर शहर बलात्काराच्या घटनेने हादरून गेले आहे. लातूरमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे दृश्यकृत्य करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. 

सहाय्यक निरीक्षक विठ्ठल दुर्पदे यांनी सांगितले की, ही घटना बुधवारी दुपारी निलंगा तहसीलमधील हलगरा गावात घडली. आरोपी करीम इमाम मुवा (वय,28) याने मुलीला दुकानातून सुपारी आणण्यास सांगितले. पण दुकान बंद असल्याने मुलगी पैसे परत करण्यासाठी त्याच्या घरी गेली. जिथे मुवाने तिच्यावर बलात्कार केला. 

हेही वाचा - Pune Shivshahi Bus Case : दत्ता गाडेला फाशी होणार?

आरोपीवर गुन्हा दाखल - 

आरोपीला भारतीय दंड संहिता (IPC) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने त्याला पुढील तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा - Pune Shivshahi Bus Case : आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला 12 मार्चपर्यंत कोठडी - 

पुणे बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. या दरम्यान, न्यायालयाने त्याला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणातील आरोपीला शुक्रवारी शिरूर तालुक्यातून अटक करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी नराधमाचे नाव दत्तात्रेय गाडे असे आहे. 

मंगळवारी पहाटे पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बसमध्ये दत्तात्रेय रामदास गाडेने तरुणीवर बलात्कार केला. गाडे यांच्याविरुद्ध पुणे आणि जवळच्या अहिल्यानगर जिल्ह्यात चोरी, दरोडा आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. 2019 पासून तो जामिनावर होता. दत्तात्रेय गाडे याला अटक करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी 13 पोलिस पथके तैनात करण्यात आली होती. गुरुवारी पुणे जिल्ह्यातील शिरूर तहसीलमधील उसाच्या शेतात शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी श्वान पथके आणि ड्रोनची मदत घेतली. त्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. 
 


सम्बन्धित सामग्री