Monday, September 16, 2024 12:26:28 AM

accident in rathotsav
रथोत्सवाला गालबोट

आषाढी एकादशीनिमित्त १४८ वर्षाची परंपरा पिंप्राळा येथे रथत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या रथोत्सवास गालबोट लागले आहे. रथोत्सवातील एक रथ एका इमारतीला जाऊन धडकला आहे.

रथोत्सवाला गालबोट 
rathotsav

१७ जुलै, २०२४ जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त १४८ वर्षाची परंपरा पिंप्राळा येथे रथत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या रथोत्सवास गालबोट लागले आहे. रथोत्सवातील एक रथ एका इमारतीला जाऊन धडकला आहे. 
जळगाव येथील पिंप्राळा येथे रथत्सवात रथ निघताना रस्त्याच्या उतारावरुन रथ खाली घसरला आणि रथ थेट एका इमारतीला जाऊन धडकला. एका तासाच्या अथक प्रयत्नाने हा रथ, दोन जेसीबींच्या साहाय्याने काढण्यात आला. त्यानंतर ही रथयात्रा पुन्हा सुरळीत सुरू झाली. 
पिंप्राळा हे प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. जे भाविक पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जाऊ शकत नाही ते पिंप्राळा येथे या रथोत्सवात सहभागी होतात. ढोल ताशांच्या गजरात लेझीमच्या तालावर तसंच सोंग घेत भाविक या रथोत्सवात सामील होत असतात. एकादशीनिमित्त बुधवारीही पिंप्राळा नगरीत हजारो भाविक हा रथ पाहण्यासाठी एकवटले होते. 
 


सम्बन्धित सामग्री