२५ जुलै, २०२४ मनमाड : नाशिकमध्ये आशा आणि गटप्रर्वतक कर्मचारी यांनी ठिय्या मांडत आंदोलन केले. नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले.
आशा आणि गटप्रर्वतक कर्मचारी यांच्यासाठी राज्यसरकारने मानधन वाढी संदर्भात जी. आर. काढलेला आहे. परंतु वाढीव मानधन तसेच पूर्वी मिळणारे मानधन अजूनपर्यंत या कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. यामुळे नाशिकच्या नांदगाव पंचायत समितीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अशा आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांकडून ठिय्या आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
काय आहेत मागण्या ?
१) आशा सेविकांना मिळणाऱ्या मानधनाची वेतन चिठ्ठी मिळावी.
२) घरकुल योजनेचा लाभ मिळावा.
३) किमान वेतन लागू करण्यात यावे.
४) जाहीर केलेले वाढीव १० हजार मानधनाचा जीआर काढून अदा करण्यात यावा.
५) राज्यसरकारी कर्मचारी म्हणून समावेश करावा.
६) आशा आणि गट प्रवर्तक यांना पेन्शन लागू करण्यात यावी.