Tuesday, June 25, 2024 12:13:00 PM

Terrible fire broke out in a girls' hostel in Pune
पुण्यात मुलींच्या वसतिगृहात भीषण आग

पुण्यात गुरूवारी मध्यरात्री मुलींच्या वसतिगृहाला आग लागली. इमारतीत लागलेल्या आगीत एक जण मृत्यूमुखी पडला आहे. इमारतीत अडकलेल्या ४८ मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली.

पुण्यात मुलींच्या वसतिगृहात भीषण आग

पुणे : पुण्यात गुरूवारी मध्यरात्री  मुलींच्या वसतिगृहाला आग लागली. इमारतीत लागलेल्या आगीत एक जण  मृत्यूमुखी पडला आहे. इमारतीत अडकलेल्या ४८ मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली. 
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर असलेल्या एका इमारतीत खाजगी शैक्षणिक संस्था आहे. या इमारतीत खालच्या मजल्यावर अभ्यासिका तर दुसऱ्या मजल्यावर स्टडी रूम आणि इतर दोन मजल्यावर या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची राहण्याची व्यवस्था आहे. गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास या इमारतीला भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे जवानांनी काही वेळातच आग विजवली. आग लागली त्यावेळी इमारतीत ४८ मुली राहत होत्या. तळमजल्यावर आग लागल्याने घाबरून तिथे राहत असलेल्या मुलींनी टेरेसवर धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्व मुलींना शेजारील इमारतीवरून शिडीच्या सहाय्याने बाहेर काढले. मात्र त्या ठिकाणी काम करत असलेल्या एका व्यक्तीचा या घटनेत गुदमरून मृत्यू झाला. 
 

              

सम्बन्धित सामग्री