Sunday, April 06, 2025 06:13:35 AM

कोल्हापुरात दहा वर्षीय मुलीची हत्या

बदलापूरची घटना ताजी असतानाच कोल्हापूर शहरा नजीक असणाऱ्या शिये गावातील रामनगर परिसरामध्ये शेतात एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे.

कोल्हापुरात दहा वर्षीय मुलीची हत्या


कोल्हापूर : बदलापूरची घटना ताजी असतानाच कोल्हापूर शहरा नजीक असणाऱ्या शिये गावातील रामनगर परिसरामध्ये शेतात एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी एका संशयीताला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनास्थळी पाहणी तपास करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या अल्पवयीन मुलीचे आई आणि वडील एमआयडीसीमध्ये कामाला गेले असताना बुधवारी दुपारपासून ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. दरम्यान रात्रभर मुलीच्या कुटुंबीयांनी परिसरामध्ये शोधाशोध केली मात्र मुलगी मिळाली नाही. अखेर कोल्हापूर पोलिसांच्या श्वान पथकाने अल्पवयीन मुलीचा मृतदेह रामनगर येथील एका उसाच्या शेतामध्ये घरापासून अवघ्या अर्धा किलोमीटर परिसरात शोधून काढला. 

प्राथमिक माहितीनुसार संबंधित मुलीच्या अंगावर ड्रेस होता मात्र चप्पल आणि अंतर वस्त्र बाजूला पडलेली पाहायला मिळाली. सध्या पोलिसांनी तपास चालू केला असून सीसीटीव्हीच्या आधारे एका संशयीताला ताब्यात घेतले असल्याचे महेंद्र पंडित यांनी सांगितले आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांनी मुलीवर अत्याचार झाल्याचा संशयदेखील व्यक्त केला आहे. मात्र संबंधित मुलींचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून तपासणी झाल्यानंतरच निष्कर्ष काढता येईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.


सम्बन्धित सामग्री