Thursday, September 12, 2024 05:19:13 PM

RAKSHABANDHAN
एक राखी कृतज्ञतेची, डोंबिवलीकरांचा अनोखा उपक्रम

गुजरात पाकिस्तान सीमेवर तैनात जवानांना डोंबिवलीकर भगिनींनी राखी बांधत यंदा अनोखा असा रक्षाबंधन सोहळा साजरा केला.

एक राखी कृतज्ञतेची डोंबिवलीकरांचा अनोखा उपक्रम

१९ ऑगस्ट, २०२४, डोंबिवली : गुजरात पाकिस्तान सीमेवर तैनात जवानांना डोंबिवलीकर भगिनींनी राखी बांधत यंदा अनोखा असा रक्षाबंधन सोहळा साजरा केला. गुजरात मधील भुज येथील सीमेवर भारत मातेचे रक्षण करणारे जवान यांच्या हातावर प्रत्यक्षात राखी बांधताना भगिनींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. तर एरवी लिफाफ्यात येणारी बहिणींची राखी यावेळी प्रत्यक्षात बहिणीने येऊन बांधल्याने जवनांसाठी देखील एक आनंदाची बाब होती. आपल्या या बहिणींना आशीर्वादासह छोटीशी भेट देत जवानांनी देखील त्यांचे आदरातिथ्य केले.

स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन निम्मित डोंबिवलीकर भगिनींसाठी माजी नगरसेवक मंदार हळबे यांच्या वतीने एक राखी कृतज्ञतेची, एक राखी जवनांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत डोंबिवलीकरांना राखी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत हजारो राख्या डोंबिवली करांनी जवनांसाठी पाठविल्या होत्या. मंदार हळबे, निलेश काळे, सोनाली हळबे, वृषाली दाबके, सुनीला पोतदार, एकलव्य आर्ट फोरम कथ्थक नृत्य कला संस्था व श्री मुद्रा कलानिकेतन यांची टीम या राख्या घेऊन भुज येथे गेली होती. येथील (BSF) सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या हातावर 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी आयोजित कार्यक्रमात या राख्या जवानांच्या हातावर बांधण्यात आल्या. 
आपले कुटुंब, घरापासून लांब असलेल्या जवानांना आपल्या लाडक्या बहिणीला भेटता येत नसल्याने रक्षाबंधन सण साजरा करता येत नाही. बहिणींची राखी पोस्टाने येते ती स्वतःच किंवा मित्रांच्या हातून आम्ही बांधून घेतो. पण यावेळी प्रत्यक्षात आमच्या काही भगिनी येथे आल्या व आम्हाला राख्या बांधल्या याचा आनंद आहे. आमच्या पेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर जो यावेळी एक वेगळाच आनंद आहे तो पाहून आम्हाला खूप बरे वाटत असल्याची प्रतिक्रिया यावेळी जवानांनी दिली.


सम्बन्धित सामग्री