Saturday, March 01, 2025 11:15:10 AM

उल्हासनगर हादरलं! 7 महिन्याचा गर्भ पुरला जमिनीत

दोन दिवसांपूर्वीच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण होते. त्यातच आता उल्हासनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय.

उल्हासनगर हादरलं 7 महिन्याचा गर्भ पुरला जमिनीत

उल्हासनगर: महाराष्ट्रात सद्या गुन्हेगारीचे सत्र वाढतांना दिसून येतंय. दोन दिवसांपूर्वीच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण होते. त्यातच आता उल्हासनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. या घटनेने संपूर्ण उल्हासनगर हादरलंय. उल्हसनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर ही मुलगी सात महिन्यांची गरोदर होती, यानंतर या प्रकरणातील संबंधित नराधमाने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि सातव्या महिन्यात तिचा गर्भपात केला. गर्भपात झाल्याचं कोणाला कळू नये म्हणून आरोपीने सात महिन्यांचा गर्भ जमिनीत पुरला.

हेही वाचा: Pune Shivshahi Bus Case : आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित आरोपी हा अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहतो, त्याने वारंवार मुलीसोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले, यातून मुलगी 7 महिन्यांची गर्भवती राहिली. मुलगी गर्भवती राहिल्याचं समजल्यानंतर आरोपीने, आरोपीच्या सासूने आणि इतर नातेवाईकांनी मुलीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. हा सात महिन्यांचा गर्भ त्यांनी जमिनीमध्ये पुरला.

दरम्यान या संपूर्ण प्रकारांची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी आरोपीला अटक केलीय. त्याचबरोबर या प्रकरणातील संबंधित नातेवाईकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्याची घटना ताजी असतांनाच आता उल्हासनगरमधून देखील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. 


सम्बन्धित सामग्री