Tuesday, June 25, 2024 12:42:00 PM

उद्धव ठाकरे पालघर दौऱ्यावर

उद्धव ठाकरे पालघर दौऱ्यावर


पालघर, ११ मे २०२४, प्रतिनिधी :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाची जोरदार तयारी चालु आहे. लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय पक्ष शक्तिप्रदर्शने, सभा घेत त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहेत. अशातच उद्धव ठाकरे पालघर दौऱ्यावर आहेत. पालघरमधील कोळगाव येथील पोलीस हेलिपॅडवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह राशपचे आमदार सुनील भुसारा यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. त्यानंतर उद्धव ठाकरे शिरगाव येथील जलदेवी रिसॉर्टकडे रवाना झाले. संघटनांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे चार वाजता साधणार पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या पत्रकार परिषदेत उद्धव काय बोलतील हे महत्त्वाचे ठरणार आहे कारण निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात पालघर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. या दृष्टीने त्यांची पत्रकार परिषद महत्त्वाची असणार आहे.


सम्बन्धित सामग्री