Tuesday, June 25, 2024 12:28:56 PM

प्रचाराच्या तोफा थंडावणार;आचारसंहितेच्या उल्लंघन केल्यास कारवाई

प्रचाराच्या तोफा थंडावणार;आचारसंहितेच्या उल्लंघन केल्यास कारवाई

छत्रपती संभाजीनगर, ११ मे २०२४, प्रतिनिधी : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या एका जागेसाठी एकूण ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रंगात आलेला प्रचार प्रसारासाठी शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत आहे. त्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणर आहेत. तसेच आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना थांबता येणार नाही. याचे उल्लंघन केले तर सहा महिने शिक्षेसह दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र, उमेदवारांना डोअर टू डोअर प्रचार करण्याची मुभा देखील आहे. त्यामुळे मतदानापूर्वीचे दोन दिवस सर्वच उमेदवार व मतदारांसाठी अतिशय महत्त्वाचे व औत्सुकतेचे ठरणार आहेत.


सम्बन्धित सामग्री