Saturday, October 05, 2024 03:16:49 PM

केजरीवालांची एनआयए चौकशी ?

केजरीवालांची एनआयए चौकशी ?

नवी दिल्ली, ६ मे २०२४, प्रतिनिधी : सिख फॉर जस्टिस नावाच्या दहशतवादी संघटनेकडून निधी घेतल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची एनआयएमार्फत चौकशी करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी ही शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवली आहे. वर्ल्ड हिंदू फेडरेशनचे सरचिटणीस आशू मोंगिया यांनी नायब राज्यपालांकडे केजरीवालांच्या विरोधात लेखी तक्रार पाठवली आहे. यात केजरीवालांच्या पक्षाने २०१४ ते २०२२ या काळात खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांकडून १३३.६० कोटी रुपयांचा (१.६ कोटी डॉलर) निधी घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. पैसा घेण्याच्या बदल्यात दहशतवादी देवेंद्र पाल भुल्लरची सुटका करण्यासाठी राजकीय हालचाली करणार असल्याचे आश्वासन केजरीवाल यांनी पक्षाच्यावतीने दिले होते, असेही तक्रारीत नमूद आहे. तक्रारीसोबत आशू मोंगिया यांनी एक पेन ड्राइव्ह पण नायब राज्यपालांना पाठवला आहे. या पेन ड्राइव्हमध्ये एक्स प्लॅटफॉर्मवर असलेले सिख फॉर जस्टिसचा संस्थापक गुरपतवंत सिंह पन्नू याचा एक व्हिडीओ आहे. या व्हिडीओत पन्नूने केजरीवालांच्या पक्षाला १३३.६० कोटी रुपये दिल्याचे सांगितले आहे.


सम्बन्धित सामग्री