Sunday, July 07, 2024 12:38:34 AM

लोकसभेसाठी मंगळवारी तिसऱ्या टप्प्याचे मतदान

लोकसभेसाठी मंगळवारी तिसऱ्या टप्प्याचे मतदान

नवी दिल्ली, ६ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवार ७ मे २०२४ रोजी होणार आहे. या टप्प्यात १२ राज्यांतील ९३ जागांवर मतदान होणार आहे. आसामच्या ४, पश्चिम बंगालच्या ४, बिहारच्या ५, छत्तीसगडच्या ७, गोव्याच्या २, गुजरातच्या २५, कर्नाटकच्या १४, मध्य प्रदेशच्या ८, उत्तर प्रदेशच्या १०, महाराष्ट्राच्या ११, दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीवच्या २ आणि जम्मू-काश्मीरच्या एका जागेवर मतदान होणार आहे.

भारतातील प्रमुख मतदारसंघ आणि तिथले प्रमुख उमेदवार

१ गांधीनगर - अमित शाह, भाजपा विरुद्ध सोनल पटेल, काँग्रेस - गुजरात
२ पोरबंदर - मनसुख मांडविया, भाजपा विरुद्ध ललित वसोया, काँग्रेस - गुजरात
३ अहमदाबाद पूर्व - हसमुखभाई पटेल, भाजपा विरुद्ध हिम्मतसिंह प्रल्हादसिंह पटेल, काँग्रेस - गुजरात
४ राजकोट - परशोत्तम सिंह रुपाला, भाजपा विरुद्ध परेश धनानी, काँग्रेस - गुजरात
५ मैनपुरी - डिंपल यादव, समाजवादी पक्ष विरुद्ध जयवीर सिंह, भाजपा - उत्तर प्रदेश
६ बारामती - सुप्रिया सुळे, राशप विरुद्ध सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस - महाराष्ट्र
७ विदिशा - शिवराजसिंह चौहान, भाजपा विरुद्ध भानुप्रताप शर्मा, काँग्रेस - मध्य प्रदेश
८ भोपाळ - आलोक शर्मा, भाजपा विरुद्ध अरुण श्रीवास्तव, काँग्रेस - मध्य प्रदेश
९ राजगड - दिग्विजय सिंह, काँग्रेस विरुद्ध रोडमल नगर, भाजपा - मध्य प्रदेश
१० गुना - ज्योतिरादित्य सिंधिया, भाजपा विरुद्ध राव यादवेंद्र सिंह यादव, काँग्रेस - मध्य प्रदेश
११ हवेरी - बसवराज बोम्मई, भाजपा विरुद्ध आनंदस्वामी गड्डादेवरामथ, काँग्रेस - कर्नाटक
१२ धारवाड - प्रल्हाद जोशी, भाजपा विरुद्ध विनोद आसूती, काँग्रेस - कर्नाटक
१३ दक्षिण गोवा - पल्लवी डेम्पो, भाजपा विरुद्ध विरियातो फर्नांडिस, काँग्रेस - गोवा
१४ धुब्री - बद्रुद्दीन अजमल, एआययूएफ विरुद्ध रकीबुल हुसेन, काँग्रेस - आसाम

महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात मंगळवार ७ मे २०२४ रोजी मतदान

१ रायगड - सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अनंत गीते, शिउबाठा विरुद्ध कुमुदिनी चव्हाण, वंचित
२ बारामती - सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सुप्रिया सुळे, राशप विरुद्ध महेश भागवत, ओबीसी बहुजन
३ उस्मानाबाद (धाराशिव) - अर्चना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध ओमराजे निंबाळकर, शिउबाठा विरुद्ध भाऊसाहेब आंधळकर, वंचित
४ लातूर - सुधाकर श्रृंगारे, भाजपा विरुद्ध शिवाजीराव कलगे, काँग्रेस विरुद्ध नरसिंहराव उदगिरकर, वंचित
५ सोलापूर - राम सातपुते, भाजपा विरुद्ध प्रणिती शिंदे, काँग्रेस विरुद्ध राहुल काशीनाथ गायकवाड, वंचित
६ माढा - रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, भाजपा विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील, राशप विरुद्ध रमेश नागनाथ बारसकर, वंचित
७ सांगली - संजय पाटील, भाजपा विरुद्ध चंद्रहार पाटील, शिउबाठा विरुद्ध प्रकाश शेंडगे, ओबीसी बहुजन विरुद्ध विशाल पाटील, अपक्ष
८ सातारा - उदयनराजे भोसले, भाजपा विरुद्ध शशिकांत शिंदे, राशप विरुद्ध प्रशांत कदम, वंचित
९ रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नारायण राणे, भाजपा विरुद्ध विनायक राऊत, शिउबाठा विरुद्ध काका जोशी, वंचित
१० कोल्हापूर - संजय मंडलिक, शिवसेना विरुद्ध शाहू छत्रपती, काँग्रेस
११ हातकणंगले - धैर्यशील माने, शिवसेना विरुद्ध सत्यजीत पाटील, शिउबाठा विरुद्ध दादासाहेब उर्फ दादागौडा पाटील, वंचित विरुद्ध राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

माघार घेतलेले प्रमुख पाच अपक्ष उमेदवार

१ विजय करंजकर - नाशिक (शिउबाठाच्या बंडखोराने शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणुकीतून माघार घेतली)
२ निवृत्ती अरिंगळे - नाशिक (राष्ट्रवादी, माघार घेतली)
३ जेपी गावित - दिंडोरी (माकप, माघार, भास्कर भगरेंना पाठिंबा)
४ हरिश्चंद्र चव्हाण - दिंडोरी (महायुती बंडखोर, माघार)
५ अनिल जाधव - नाशिक (महायुती बंडखोर, माघार)


सम्बन्धित सामग्री