Sunday, July 07, 2024 09:42:12 PM

अमित शाहंचा 'फेक व्हिडीओ', पोलिसांत तक्रार

अमित शाहंचा

मुंबई, २९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या महाराष्ट्र काँग्रेस (युथ) सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. यावेळी ज्या सोशल मीडियावरील अकाउंट्सवरून बनावट व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे त्याची तपशीलवार माहितीही पोलिसांना देण्यात आली. यामध्ये महाविकास आघाडीशी संबंधित महाराष्ट्र काँग्रेसच्या युथ एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम अकाऊंटचा समावेश आहे.

https://www.youtube.com/watch?v=yKwnf7D28uw

गृहमंत्री अमित शाह यांनी एससी/एसटी किंवा ओबीसी आरक्षण संपविण्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही, हा व्हिडीओ खोटा आहे. यापूर्वीच्या भाषणांदरम्यान शाह म्हणाले होते की, सरकार स्थापन होताच मुस्लिम समाजाला दिलेले असंवैधानिक आरक्षण काढून टाकण्यात येईल. हा फेक व्हिडीओ महाविकास आघाडीतील युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षांच्या विविध जिल्ह्यांचे एक्स, इंस्टाग्राम, फेसबुकपेज, तसेच विविध पक्ष, सेल आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या एक्स अकाउंटवरून प्रसारित करण्यात आला आहे. असा बनावट व्हिडीओ बनवून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भारतीय जनता पार्टीची बदनामी करून समाजातील विविध गटांमध्ये तेढ निर्माण होईल, असा प्रयत्न करण्यात आला.


सम्बन्धित सामग्री