बुलढाणा, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बुलढाणा लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आज (२४ एप्रिल २०२४) भाजप नेते नितीन गडकरी चिखली येथे सभा घेणार आहेत. आपल्या महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ ते सभा घेणार आहे. या सभेदरम्यान नितीन गडकरी विकासाच्या मुद्द्यांवर बोलणार असून या व्यतिरिक्त आणखी कुठल्या मुद्द्यांना नितीन गडकरी हात घालतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. नितीन गडकरी आपल्या शैलीत नेहमीप्रमाणे विकासाच्या मुद्द्यावर बोट ठेवून भाषण करत आलेले आहेत.. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये बुलढाणाकरांसाठी नितीन गडकरी काय नेमकी आश्वासन देतात आणि केलेल्या कामांचा कशा पद्धतीने मागोवा घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.