Monday, September 09, 2024 05:55:50 PM

निवडणुकीसाठी ३६१ उमेदवार आणि ५२२ अर्ज

निवडणुकीसाठी ३६१ उमेदवार आणि ५२२ अर्ज

मुंबई, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ३६१ उमेदवारांनी ५२२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे आणि छाननी प्रक्रिया सुरू आहे.

रायगड लोकसभा मतदार संघात २८ उमेदवारांचे ४० अर्ज, बारामतीत ५१ उमेदवारांचे ६६ अर्ज, उस्मानाबादमध्ये ३६ उमेदवारांचे ७७ अर्ज, लातूरमध्ये ३६ उमेदवारांचे ५० अर्ज, सोलापूरमध्ये ४१ उमेदवारांचे ५३ अर्ज, माढात ४२ उमेदवारांचे ५५ अर्ज, सांगलीत ३० उमेदवारांचे ३९ अर्ज, सातारा मतदारसंघात २४ उमेदवारांचे ३३ अर्ज, रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात ९ उमेदवारांचे १३ अर्ज, कोल्हापूरमध्ये २८ उमेदवारांचे ४१ अर्ज आणि हातकणंगले मतदारसंघात ३६ उमेदवारांचे ५५ अर्ज आले आहेत.

लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा
महाराष्ट्रात ११ मतदारसंघांसाठी ७ मे रोजी मतदान
निवडणुकीसाठी ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज आले
अर्ज दाखल करण्याची मुदत संपली, छाननी प्रक्रिया सुरू


सम्बन्धित सामग्री