Sunday, July 07, 2024 09:50:57 PM

यूपीएससीत महाराष्ट्रातील ८७ पेक्षा जास्त विद्यार्थी यशस्वी

यूपीएससीत महाराष्ट्रातील ८७ पेक्षा जास्त विद्यार्थी यशस्वी


नवी दिल्ली, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय नागरी लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण १०१६ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील ८७ हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास ८.६ टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून समीर प्रकाश खोडे प्रथम आला, देशात त्यांनी ४२ वा क्रमांक पटकाविला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष २०२३ च्या मुख्य परिक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमधे महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. नेहा राजपूत यांनी ५१वा तर अनिकेत हिरडे यांनी ८१ वा क्रमांक पटकावला आहे.

एक नजर निकालावर

समीर प्रकाश खोडे (४२) नेहा उद्धवसिंग राजपूत (५१) अनिकेत ज्ञानेश्वर हिर्डे (८१) विनय सुनील पाटील (१२२) विवेक विश्वनाथ सोनवणे (१२६) तेजस सुदीप सारडा (१२८) जान्हवी बाळासाहेब शेखर (१४५) आशिष अशोक पाटील (१४७) अर्चित पराग डोंगरे (१५३) तन्मयी सुहास देसाई (190) ऋषिकेश विजय ठाकरे (२२४) अभिषेक प्रमोद टाले (२४९) समर्थ अविनाश शिंदे (२५५) मनीषा धारवे (२५७) शामल कल्याणराव भगत (२५८) आशिष विद्याधर उन्हाळे (२६७) शारदा गजानन मद्येश्वर (२८५) निरंजन महेंद्रसिंह जाधवराव (२८७) समिक्षा म्हेत्रे (३०२) हर्षल भगवान घोगरे (३०८) वृषाली संतराम कांबळे (३१०) शुभम भगवान थिटे (३५९) अंकेत केशवराव जाधव (३९५) शुभम शरद बेहेरे (३९७) मंगेश पाराजी खिलारी (४१४) मयूर भारतसिंग गिरासे (४२२) अदिती संजय चौगुले (४३३) अनिकेत लक्ष्मीकांत कुलकर्णी (४३७) क्षितिज गुरभेले (४४१) अभिषेक डांगे (४५२) स्वाती मोहन राठोड (४९२) लोकेश मनोहर पाटील (४९६) सागर संजय भामरे (५२३) मानसी नानाभाऊ साकोरे (५३१) नेहा नंदकुमार पाटील (५३३) युगल कापसे (५३५) हर्षल राजेश महाजन (५३९) अपूर्व अमृत बालपांडे (५४६) शुभम सुरेश पवार (५६०) विक्रम जोशी (593) प्रियंका मोहिते (595) अविष्कार डेरले (६०४) केतन अशोक इंगोले (६१०) राजश्री शांताराम देशमुख (६२२) संस्कार निलाक्ष गुप्ता (६२९) सुमित तावरे (६५५) सुरेश लीलाधरराव बोरकर (६५८) अभिषेक अभय ओझर्डे (६६९) नम्रता घोरपडे (675) जिज्ञासा सहारे (681) श्रृति कोकाटे (६८५) अजय डोके(६८७) सूरज प्रभाकर निकम (७०६) श्वेता गाडे (७११) अभिजित पखारे (७२०) कृणाल अहिरराव (७३२) हिमांशु टेभेंकर (७३८) सुमितकुमार धोत्रे (७५०) गौरी देवरे (७५९) प्रांजली खांडेकर (७६१) प्रितेश बाविस्कर (७६७) प्रशांत डांगळे (७७५) प्रतिक मंत्री (७८६) मयुरी माधवराव महल्ले (७९४) राहुल पाटील (८०४) सिध्दार्थ तागड (८०९) प्राजंली नवले (८१५) सिध्दार्थ बारवळ (८२३) ओमकार साबळे (८४४) प्रशांत सुरेश भोजने (८४९) प्रतिक बनसोडे (८६२) चिन्मय बनसोड (८९३) निखील चव्हाण (९००) विश्वजीत होळकर (९०५) अक्षय लांबे (९०८) निलेश डाके (९१८) किशनकुमार जाधव (९२३) ऐश्वर्या दादाराव उके (९४३) स्नेहल वाघमारे (९४५) शुभम त्रंबकराव डोंगरदिवे (९६३) गौरव हितेश टेंभुर्णीकर (९६६) मयांक खरे (९६८) शिवानी वासेकर (९७१) श्रावण अमरसिंह देशमुख (९७६) श्रुती उत्तम श्रोते (९८१) सुशीलकुमार सुनील शिंदे (९८९) आदित्य अनिल बामणे (१०१५)

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. जानेवारी - एप्रिल २०२४ दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण १०१६ उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –३४७, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) ११५, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) - ३०३, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) - १६५, अनुसूचित जमाती प्रवर्गातून- ८६ उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये ३७ दिव्यांग उमेदवारांचा (१६ ऑर्थोपेडिकली अपंग, ६ दृष्टीहीन, ५ श्रवणदोष आणि १० एकाधिक अपंग) यांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने २४० उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- १२०, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- ३६, इतर मागास वर्ग -६६, अनुसूचित जाती- १०, अनुसूचित जमाती - ४ उमेदवारांचा समावेश आहे. यासोबत एकूण चार दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत शासनाकडे एकूण -१८० जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – ७३, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) १७ इतर मागास वर्ग (ओबीसी) –४९, अनुसूचित जाती (एससी) – २७, अनुसूचित जमाती (एसटी) १४ जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत शासनाकडे एकूण – ३७ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – १६, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) ४, इतर मागास वर्ग (ओबीसी) – १०, अनुसूचित जाती (एससी) – ५, अनुसूचित जमाती (एस.टी.) – २ जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण – २०० जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – ८०, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) २०, इतर मागास प्रवर्गातून - ५५, अनुसूचित जाती प्रवर्गातून - ३२, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – १३ उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ - या सेवेमध्ये एकूण - ६१३ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - २५८, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) ६४ , इतर मागास प्रवर्गातून - १६०, अनुसूचित जाती प्रवर्गातून - ८६ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –४५ उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब - या सेवेमध्ये एकूण – ११३ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - ४७, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) १० उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून - २९, अनुसूचित जाती प्रवर्गातून – १५ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून -१२ उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण ३५५ उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची असेल. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल, देशपातळीवरील गुणवत्ता यादी
१ आदित्य श्रीवास्तव
२ अनिमेष प्रधान
३ डोनुरु अनन्या रेड्डी
४ पीके सिद्धार्थ रामकुमार
५ रुहानी
६ सृष्टी दाबस
७ अनमोल राठोड
८ आशिष कुमार
९ नौशीन
१० ऐश्वर्याम प्रजापती


सम्बन्धित सामग्री