Monday, September 09, 2024 06:01:25 PM

राशपची तिसरी यादी जाहीर, पण…

राशपची तिसरी यादी जाहीर, पण…

मुंबई, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाची अर्थात राशपची तिसरी लोकसभा उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीद्वारे दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माढाच्या जागेवरून अंतर्गत तिढा असल्यामुळे राशपने अद्याप माढाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

मविआ महाराष्ट्रातील लोकसभेच्या दहा जागा लढवणार आहे. यापैकी नऊ उमेदवारांच्या नावांची घोषणा राशपने केली आहे. अद्याप माढा लोकसभा मतदारसंघाचसाठीचा उमेदवार राशपने जाहीर केलेला नाही.

शशिकांत शिंदे २००९ ते २०१४ दरम्यान कोरेगावचे आमदार होते. आघाडी सरकारच्या काळात ते जलसंपदा मंत्री होते. भाजपाने साताऱ्याचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. पण साताऱ्यातून उदयनराजे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा सामना उदयनराजेंशी होणार असल्याची चर्चा आहे. तर रावेरमध्ये श्रीराम पाटील यांचा सामना भाजपाच्या रक्षा खडसे यांच्याशी होणार आहे.

राशपचे जाहीर झालेले नऊ उमेदवार
वर्धा - अमर काळे
बारामती - सुप्रिया सुळे
सातारा - शशिकांत शिंदे
रावेर - श्रीराम पाटील
शिरुर - अमोल कोल्हे
अहमदनगर - निलेश लंके
बीड - बजरंग सोनावणे
दिंडोरी - भास्कर भगरे
भिवंडी - सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे

अशा होणार लढती
वर्धा - रामदास तडस, भाजपा विरुद्ध अमर काळे, राशप विरुद्ध प्रा. राजेंद्र साळुंके, वंचित
बारामती - सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सुप्रिया सुळे, राशप विरुद्ध महेश भागवत, ओबीसी बहुजन
सातारा - शशिकांत शिंदे, राशप विरुद्ध मारुती जानकर, वंचित
रावेर - रक्षा खडसे, भाजपा विरुद्ध श्रीराम पाटील, राशप विरुद्ध संजय ब्राह्मणे, वंचित
शिरुर - शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अमोल कोल्हे, राशप
अहमदनगर - सुजय विखे पाटील, भाजपा विरुद्ध निलेश लंके, राशप
बीड - पंकजा मुंडे, बीड, भाजपा विरुद्ध बजरंग सोनावणे, राशप
दिंडोरी - भारती पवार, भाजपा विरुद्ध भास्कर भगरे, राशप
भिवंडी - कपिल पाटील, भाजपा विरुद्ध सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, राशप


सम्बन्धित सामग्री