Wednesday, October 02, 2024 10:51:04 AM

मनसे महायुतीत जाणार, गुढी पाडव्याला घोषणा करणार ?

मनसे महायुतीत जाणार, गुढी पाडव्याला घोषणा करणार ?

मुंबई, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राज ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष महायुतीत जाणार की नाही हे गुढी पाडव्याच्या मनसेच्या सभेतून जाहीर होण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांपासून मनसेने हिंदुत्वाच्या पुरस्काराची भूमिका घेतली आहे. ही भूमिका घेतल्यापासून मनसे आणि भाजपा यांच्यातील संवाद वाढला आहे. आता मनसे महायुतीत येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

https://twitter.com/mnsadhikrut/status/1777192144723472867

याआधी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी मनसेने उघडपणे पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला. मोदींनी गुजरातमध्ये विकास केला आहे आणि असाच विकास ते देशात करू शकतात असा विश्वास मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीरपणे व्यक्त केला होता. नंतर काही काळ मनसेने भाजपाच्या विरोधात राजकीय भूमिका घेतली होती. पण काही काळानंतर पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या मनसेने मोदींना पाठिंबा देण्यास सुरुवात केली होती. यामुळे मनसे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होण्याआधीच महायुतीसोबत जात असल्याची घोषणा करेल, अशी चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासह देशात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. मतनमोजणी ४ जून रोजी होणार आहे.

काय म्हणाले फडणवीस ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होईल, असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींच्या चंद्रपूरच्या सभेने राज्यातील महायुतीबाबतची अनुकूलता अधिक मोठ्या विजयात परावर्तित होईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. मोदींची चंद्रपूरची सभा सोमवार ८ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी होणार आहे.


सम्बन्धित सामग्री