Sunday, October 06, 2024 06:51:46 AM

छत्रपती संभाजीनगर शहरात पाणीसंकट

छत्रपती संभाजीनगर शहरात पाणीसंकट

छत्रपती संभाजीनगर, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर शहरातील काही भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावात महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. जायकवाडी जलाशयात २२ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील पाण्याचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

यंदा कमी पाऊस पडला. आता पाण्याचा साठा वेगाने कमी होत आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याचे संकट तीव्र होऊ लागले आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर शहराला सात ते आठ दिवसांनी पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र आठ दिवसांनी पुरवठा करूनही पाणी पुरणार नसल्यामुळे मनपा प्रशासापुढील आव्हान आणखी गंभीर झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहराला दररोज १२० एमएलडी पाणी मिळत आहे. पाण्याची मागणी आणि होणारा पुरवठा यात मोठी तफावत आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.


सम्बन्धित सामग्री