पुणे, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : सुप्रिया सुळेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी दिली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतील एक घटक पक्ष आहे. यामुळे भाजपा आणि शिवसेनेने बारामतीतून उमेदवार उभा करणार नसल्याचे संकेत दिले आहेत. पण शिवसेनेचे विजय शिवतारे सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी बारामतीमधून लोकसभा लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. याच संदर्भात काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना अनेक तास भेटच दिली नव्हती. यानंतर परत गेलेल्या शिवतारे सध्या पुण्यात आहेत. पण बारामतीची निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विजय शिवतारे महायुती धर्माचे पालन करतील, असा विश्वास व्यक्त केला. यानंतर लगेच ट्वीट करून आणि 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीला टॅग करत शिवतारे यांनी माघार घेतली नसल्याचे जाहीर केले. पुढचा निर्णय बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांशी चर्चा करून घेईन, असेही शिवतारेंनी ट्वीट केले.