Sunday, July 07, 2024 09:58:02 PM

सामान्यांच्या जगण्यावर परिणाम करणारे 'हे' नियम बदलणार

सामान्यांच्या जगण्यावर परिणाम करणारे

नवी दिल्ली, २९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : सामान्यांच्या जगण्यावर परिणाम करणारे निवडक नियम शुक्रवार १ मार्च २०२४ पासून बदलणार आहेत.

जीएसटी : जीएसटीच्या नव्या नियमानुसार पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल करणारे व्यावसायिक ई - चलान मिळाल्यानंतरच ई - वे बिल तयार करू शकणार.

एलपीजी आणि सीएनजी : एलपीजी आणि सीएनजीच्या दरात बदल होणार की नाही याचा निर्णय गुरुवार किंवा शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

फास्टॅग : एनएचएआयच्या निर्देशानुसार फास्टॅगसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत गुरुवार २९ फेब्रुवारी २०२४ रोजी संपणार आहे. अद्याप मुदतवाढ जाहीर झालेली नाही.

क्रेडिट कार्ड : भारतीय स्टेट बँक क्रेडिट कार्डसाठी १५ मार्च २०२४ पासून नवा नियम लागू करणार आहे. मिनिमम डे बिल कॅवक्युलेशन संदर्भातला हा नियम ग्राहकांना ई-मेलद्वारे कळवला जाईल.


सम्बन्धित सामग्री