Wednesday, October 02, 2024 12:51:30 PM

मराठवाड्यात म्हाडाच्या घरांसाठी सोडत

मराठवाड्यात म्हाडाच्या घरांसाठी सोडत

छत्रपती संभाजीनगर, २९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : म्हाडाने छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्हा, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत असलेल्या ९४१ सदनिका, ३६१ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयात झाला.

म्हाडाचे मुख्याधिकारी मंदार वैद्य यांच्या हस्ते या सोडत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी निवृत्त न्यायाधिश शेटे, उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा सूचना अधिकारी थोरात, उपमुख्याधिकारी जयकुमार नामेवार, बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य व्यवस्थापक गुरुप्रीत कौर कांबो उपस्थित होते. सदनिका विक्री सोडतीची लिंक २७ मार्च, २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत कार्यरत असेल. २७ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करू शकतील. २८ मार्चला संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस / एनईएफटी द्वारे अनामत रकमेचा भरणा करता येईल.. सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी ४ एप्रिल रोजी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध होईल. तर १२ एप्रिल रोजी अंतिम पात्र अर्जाची यादी जाहीर होणार असून, सोडतीचे स्थळ व दिनांक नंतर कळविण्यात येईल, असे म्हाडाने सांगितले.


सम्बन्धित सामग्री