Thursday, July 04, 2024 09:01:40 AM

महाराष्ट्रात मराठा आरक्षण

महाराष्ट्रात मराठा आरक्षण

मुंबई, २७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू झाले आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातला शासन आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून निघाला आहे. राज्यात शिक्षण आणि नोकरीसाठी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे. याआधी २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांनी एकमताने मराठा आरक्षणाच्या तरतुदींना मंजुरी दिली होती. आता मराठा आरक्षणाचा शासन आदेश निघाला आहे.

मराठा आरक्षणाचा शासन आदेश

"सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग" असा नवीन वर्ग निर्माण करण्यात आला असून, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गासाठी यापुढे होणाऱ्या नोकर भरतीप्रक्रियेत आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये २६ फेब्रुवारी २०२४ पासून १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री