नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या ५६ जागांपैकी सहा जागा महाराष्ट्रात आहेत. निवडणुकीद्वारे महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा खासदार जाणार आहेत. मतांचे ताजे गणित पाहता महायुतीकडे पाच तर महाविकास आघाडीकडे एका उमेदवाराला आरामात निवडून देण्याएवढी मते आहेत. प्रत्येकाने कोट्यानुसार उमेदवार दिला, तर निवडणूक बिनविरोध होईल. पण महाविकास आघाडीने अतिरिक्त उमेदवार दिला तर भाजपाचा चौथा उमेदवार रिंगणात उतरणार आहे.
निवृत्त होणार असलेले महाराष्ट्रातील खासदार
नारायण राणे, भाजपा
प्रकाश जावडेकर, भाजपा
व्ही व्ही मुरलीधरन, भाजपा
अनिल देसाई, शिवसेना
कुमार केतकर, काँग्रेस
वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस
सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर महाविकास आघाडीला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे.
राज्यसभेसाठी कोणत्या नेत्यांच्या नावांची चर्चा ?
भाजपाकडून
नारायण राणे आणि प्रकाश जावडेकर
तिसऱ्या जागेसाठी - विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांच्यापैकी एक
शिवसेनेकडून
मिलिंद देवरा
राष्ट्रवादी काँग्रेसकडून
पार्थ पवार
काँग्रेसकडून
कन्हैयाकुमार