Sunday, October 06, 2024 02:53:01 AM

राष्ट्रवादी अजित पवारांची !

राष्ट्रवादी अजित पवारांची !

नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे सुप्रिया गटाला धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने उपलब्ध कागदपत्रे तपासून तसेच साक्षी - पुरावे यांची नोंद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे निवडणूक चिन्ह हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीच्या प्रकरणात दहा पेक्षा जास्त वेळा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी झाली. ही सुनावणी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ सुरू होती. सुनावणीअंती निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांच्या गटाला दिले. सुप्रिया गटाला निवडणूक आयोगाने बुधवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पक्षाच्या नव्या नावाचे तीन पर्याय घेऊन बोलावले आहे. यातून एका नावाची निवड करून ते निवडणूक आयोग सुप्रिया गटाला देणार आहे. सुप्रिया गटाच्या पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोग नंतर घेणार आहे.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे
सुप्रिया गटाला मोठा धक्का
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

काय म्हणाले अजित पवार ?

https://twitter.com/mahancpspeaks/status/1754874503799157072

'केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल नम्रपणे स्वीकारतो' या शब्दात अजित पवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.

धनंजय मुंडेंचे ट्वीट

https://twitter.com/dhananjay_munde/status/1754875660193931425

'घड्याळ आणि वेळ दोन्हीही दादांचीच! निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत! या निकालातून आमचा निर्णय योग्यच होता हे पुन्हा एकदा नियतीने सिद्ध केले. पक्षातील सर्व मान्यवर नेत्यांचे आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन. हा विजय लोकशाहीचा' या शब्दात धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

'जे शिवसेनेच्या बाबतीत केले तेच आमच्या बाबतीत केले. मला काहीच आश्चर्य वाटलं नाही. शरद पवारांनी शून्यातून पक्ष उभा केला. निकाल आमच्या विरोधात आणि असाच येईल असे वाटत होते. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार', असे सुप्रिया सुळे म्हणाले.

महत्त्वाचे मुद्दे

शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का
अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं
सुप्रिया गटाला मोठा धक्का

घड्याळ चिन्ह दादा गटाला मिळाले
निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना धक्का

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाण्यात जल्लोष
ठाण्यातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष

सुप्रिया गटाला स्वतंत्र पक्ष म्हणून मान्यता
बुधवारपर्यंत पक्षाचं नाव सुचविण्याचे आदेश
अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागणार

निवडणूक आयोगाने काय म्हटलं आहे ?

अजित पवाराकंडील पक्ष खरा पक्ष
पक्ष आणि चिन्ह अजित पवार वापरतील
दोन खासदार अजित पवार गटाच्या बाजूने
पाच आमदारांनी दोन्ही बाजूंनी पत्र दिलं
बुधवार ७ फेब्रुवारीपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह सुचवावं
पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नाहीत

अजित पवारांसोबत कोण?

महाराष्ट्रातील ४१ आमदार
नागालँडमधील ७ आमदार
झारखंड १ आमदार
लोकसभा २ खासदार
महाराष्ट्र विधानपरिषदेचे ५ आमदार
राज्यसभेचा १ खासदार

शरद पवारांसोबत कोण ?

महाराष्ट्रातील आमदार १५
केरळमधील आमदार १
लोकसभा खासदार ४
महाराष्ट्र विधानपरिषद ४
राज्यसभा खासदार ३

शरद पवारांना धक्का कसा ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह हातातून गेलं

पक्षाचे नवे नाव आणि चिन्हासह जनतेत जावे लागणार

निवडणूक आयोगाच्या निकालाचा अपात्रता निर्णयावर परिणाम होण्याची शक्यता

आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोठा फटका

अजित पवारांचा पक्षादेश सर्व आमदारांना लागू

सुप्रिया गटासमोर आव्हान काय ?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कायदेशीर लढाईसाठी फार कमी वेळ
कायदेशीर लढाई लढायची झाल्यास पक्ष आणि चिन्ह सुद्धा मिळणार नाही
यासाठी मोठी रणनीती आखावी लागणार आहे.
जे नाव आणि चिन्ह दिलं जाईल ते अत्यंत कमी कालावधीत लोकांपर्यंत पोहोचावावं लागणार


सम्बन्धित सामग्री