Saturday, July 06, 2024 10:51:45 PM

बिहारमध्ये राजकीय घडामोडींचा वेग

बिहारमध्ये राजकीय घडामोडींचा वेग

पाटणा, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी संयुक्त जनता दलाच्या सर्व आमदारांना रविवारी बैठकीसाठी पाटण्यात बोलावले आहे. यामुळे नितीशकुमार काय करणार यावरून चर्चेला उधाण आले आहे.

https://www.youtube.com/watch?v=p8mYdymDcUg

https://www.youtube.com/watch?v=z7EqolWlh9U

नितीशकुमार काय करण्याची शक्यता ?

लालू यादव यांच्या पक्षाचा पाठिंबा काढून घेतील
राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील
सरकार अल्पमतात आल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री बनतील
विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले तर नवी युती करतील
भाजपासोबत संयुक्त जनता दलाची युती करतील.
नव्या युतीचे बिहारमध्ये शनिवारी सरकार
राजकीय समीकरणे न जुळल्यास नितीश विधानसभा बरखास्त करतील

भाजपाची बैठक

पाटणा येथे बिहार भाजपा प्रभारी विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बिहारमधील भाजपाच्या आमदार आणि खासदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीत बिहारमधील ताज्या राजकीय घडामोडींवर चर्चा सुरू आहे. भाजपाच्या पुढील राजकीय हालचालींवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

मांझींची बैठक

जीतन राम मांझी यांच्या अध्यक्षतेखाली हिंदुस्तानी अवाम मोर्चाच्या आमदारांची बैठक बिहारमध्ये सुरू आहे.

https://www.youtube.com/watch?v=o3UEa-VqPx4

बिहार विधानसभा

राष्ट्रीय जनता दल (राजद / RJD) - ७९
भारतीय जनता पार्टी (भाजपा / BJP) - ७८
जनता दल संयुक्त (जदयू / JDU) - ४५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस / CONGRESS) - १९
भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट (CPI - M) - १२
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम / HAM) - ४
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) - २
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) - १
अपक्ष (IND) - १
बहुमताचा जादुई आकडा - १२२
बिहार विधानसभा एकूण जागा - २४३

भाजपा, जदयू आणि हम एकत्र आले तर…

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मोदी विरोधकांना सोडून भाजपा आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चासोबत युती केली तर बिहारला नवे स्थिर सरकार मिळू शकते. सध्या बिहारच्या राजकीय वर्तुळात या शक्यतेची चर्चा सुरू आहे.

भारतीय जनता पार्टी (भाजपा) - ७८
जनता दल संयुक्त (जदयू) - ४५
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम) - ४
एकूण आमदार - १२७
बहुमतापेक्षा पाच जास्त


सम्बन्धित सामग्री