Saturday, October 05, 2024 03:25:22 PM

राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीत काय झाले ?

राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीत काय झाले ?

मुंबई, १६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू केली आहे. मंगळवार १६ जानेवारी २०२४ रोजी या प्रकरणात झालेली सुनावणी संध्याकाळी संपली. यावेळी अध्यक्षांनी कागदपत्रांची आदलाबदल केली. तसेच पुढील सुनावणी ही शनिवार २० जानेवारी रोजी घेणार असल्याचे सांगितले. दोन्ही गटातील सदस्यांना फेरसाक्ष देण्यासाठी शनिवारी बोलावण्यात आले आहे. आमदारांची नियमित फेरसाक्ष शनिवारपासून सुरू होणार आहे. ही सुनावणी २५ जानेवारी पर्यंत होणार आहे. नंतर दोन्ही गटाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय राखून ठेवतील. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ३१ जानेवारीपर्यंत निर्णय देण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री