Saturday, October 05, 2024 03:12:06 PM

'शिवसेना एकच आणि ती शिंदेंचीच, अनिल परब दिशाभूल करतायत'

मुंबई, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. या निकालानंतर 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत नार्वेकर यांनी सर्व प्रश्नांना मोकळेपणाने स्पष्ट उत्तरं दिली. निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली चौकट आणि निकाल देण्यासाठी पार पाडलेली प्रक्रिया यावर नार्वेकर बोलले. त्यांनी सोप्या शब्दात निकाल समजावून सांगितला. शिवसेना फुटलेली नाही… शिवसेना एकच आणि ती शिंदेंचीच असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. शिवसेनेची घटना या मुद्यावर अनिल परब दिशाभूल करत आहेत, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचा निकालही कायद्याच्या चौकटीतच लागेल असे एका प्रश्नाला उत्तर देताना नार्वेकरांनी सांगितले.

विशेष मुलाखतीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे

'माझ्यावर झालेले आरोप बिनबुडाचे'
'सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला'
'पण दबावाचा निर्णयावर परिणाम झालेला नाही'
'नैसर्गिक न्यायाचा वापर करत प्रत्येकाला बोलण्याची संधी''
'युक्तिवादाच्या आधारावर निर्णय'
'पक्षघटना, संघटनात्मक रचना, बहुमत विचारात घेऊन निर्णय'
'पक्षाने नियमांचे पालन करणे गरजेचे'
'राजकीय पक्षात फूट, मात्र विधीमंडळ पक्षात फूट नाही'
'विधीमंडळात फक्त शिवसेना हाच पक्ष'
'शिंदेंचा व्हिप शिवसेना विधिमंडळ गटाला पाळावा लागेल'
'शिवसेनेच्या एकाही आमदाराने शिंदेंना आव्हान दिलेले नाही'
'शिवसेनेच्या आमदाराला गोगवलेंचा आदेश बंधनकारक'
'शिवसेना फुटलेली नाही'
'शिवसेना एकच आणि ती शिंदेंचीच'
'न्यायालयाचा निर्णय आणि माझा निर्णय यात विरोधाभास नाही'
'न्यायालयाने आखलेल्या चौकटीतच निर्णय दिला'
'सर्वोच्च न्यायालयाने सांगितले तसा आदेश दिला'
'कायद्यासमोर मनमानी कारभार चालत नाही'
'राष्ट्रवादीचा निकाल देतानाही संविधानाच्या चौकटीतच'
'अनिल परब दिशाभूल करतायत'
'घटना बदल ठाकरेंनी आयोगाला सांगितलाच नाही'
'आयोगाला उद्धव पक्षप्रमुख झाल्याचेही कळवले नाही'
'पक्षाने संधी दिली तर लोकसभा लढेन'
'लोकसभा लढायचे माझे स्वप्न नाही'
'भाजपाने युवा पिढीला प्रोत्साहन दिले, म्हणून मी विधानसभा अध्यक्ष'
'अध्यक्ष म्हणून माझ्यासाठी सर्व पक्ष समान'
'मिलिंद देवरा यांनी स्वत:ची होणारी कोंडी संपवली'
'कुणासाठीही तडजोड करणार नाही, पक्षादेश सर्वश्रेष्ठ'
'अरविंद सावंत मोदींमुळे निवडून आले'
'दक्षिण मुंबईचे मतदार मोदींसोबत'


सम्बन्धित सामग्री