Saturday, October 05, 2024 03:07:00 PM

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल ?

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल ?

मुंबई, ८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवार १० जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ४ वाजता लागण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देण्याची शक्यता आहे. विधीमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जातील. सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आम्हीही निर्णयाची वाट पाहतोय, या शब्दात निकालाचे सूतोवाच केले.

उद्धव गट आणि शिंदे गटाकडून ३४ याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल
टप्प्याटप्प्याने सहा वेगवेगळ्या वेळी याचिका दाखल
उद्धव गटाकडून चार वेगवेगळ्या वेळी याचिका दाखल
शिंदे गटाकडून दोन वेगवेगळ्या वेळी याचिका दाखल
निकाल देताना कोणती याचिका विचारात घ्यावी याचे स्वातंत्र्य विधानसभाध्यक्षांना

विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्रता प्रकरणी बुधवारी निकाल येणार
बुधवारी संध्याकाळी चार नंतर निकाल येणार
निकालाविरोधात एखादा गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता
सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची शक्यता कमी
विधानसभाध्यक्षांचा अधिकार न्यायालय मान्य करणार
निकालात काही बेकायदेशीर, घटनाबाह्य आढळल्यास न्यायालय तेवढ्याच मुद्यावर हस्तक्षेप करण्याची शक्यता


सम्बन्धित सामग्री