Wednesday, October 02, 2024 12:54:56 PM

मोदींच्या हस्ते १४ हजार कोटींच्या विकास योजनांचे उद्घाटन

मोदींच्या हस्ते १४ हजार कोटींच्या विकास योजनांचे उद्घाटन

शिर्डी, २६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान मोदी ५ वर्षांनंतर शिर्डीत आले. यावेळी मोदींच्या हस्ते १४ हजार कोटींच्या विकास योजनांचे उद्घाटन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील हे सर्वजण याप्रसंगी उपस्थित होते.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1717467787801891037

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1717450916457246864

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1717461326497468505

शिर्डीत पंतप्रधान मोदींच्या हस्ते विकास योजनांचे उद्घाटन

१. भाविकांसाठीच्या दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन
२. निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे लोकार्पण
३. राष्ट्रीय महामार्ग १६६ च्या सांगली ते बोरगाव टप्प्याच्या चौपदरीकरणाचे लोकार्पण
४. जळगाव ते भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण
५. कुर्डुवाडी ते लातूर रोड रेल्वे विभागाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
६. मनमाड गॅस टर्मिनलच्या अतिरिक्त सुविधांचा शुभारंभ
७. अहमदनगर येथे माता व बाल आरोग्य जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन
८. राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत अहमदनगरमध्ये आयुष रुग्णालयाचे उद्घाटन


सम्बन्धित सामग्री