Tuesday, July 02, 2024 09:02:14 AM

मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा यलो अलर्ट

मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा यलो अलर्ट

पुणे, ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही भागात यलो अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस, पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भात यवतमाळ, वर्धा, नागपूर सह काही भागात मुळसाधार पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसानंतर राज्यात यलो तसेच ऑरेंज अलर्ट वर्तवण्याची शक्यता आहे. वायव्य आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५ सप्टेंबर नंतर संपूर्ण राज्यात मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. ६ आणि ७ सप्टेंबर नंतर मॉन्सून कोकणात आणि विदर्भात सर्वाधिक सक्रिय होणार आहे.

कोकण, गोवा, विदर्भात पुढील सात दिवस बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस, मराठवाडा आणि विदर्भात पुढील पाच दिवस वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुणे आणि परसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ५, ६, ७ तारखेला पुण्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ४ सप्टेंबर - आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी, संध्याकाळी पूर्णतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री