Tuesday, July 02, 2024 08:55:40 AM

नेपाळविरुद्ध रोहित शर्माची विक्रमी खेळी

नेपाळविरुद्ध रोहित शर्माची विक्रमी खेळी

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : नेपाळचा १० विकेट्सने पराभव करत भारताने आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीत प्रवेश केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेपाळच्या संघाने ५० षटकात २३० धावा केल्या. परंतु, भारताच्या डावात पाऊसाला सुरुवात झाली. यानंतर सुमारे दोन तास सामना थांबवण्यात आला. यानंतर डकवर्थ लुईस नियम अतंर्गत भारतासमोर २३ षटकात १४५ धावांचे लक्ष्य मिळाले. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरचे विक्रम मोडीत काढला आहे.

नेपाळविरुद्ध सामन्यात रोहित शर्माने ५९ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी केली. या कामगिरीसह रोहित शर्मा आशिया चषकात सर्वाधिक ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने आशिया चषकात १० पेक्षा जास्त वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावावर हा विक्रम होता. सचिन तेंडुलकरने आशिया चषकात ९ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. आशिया चषकात सर्वाधिक ५० धावा केलेल्या फलंदाजाच्या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा अव्वल स्थानी आहे. संगकाराने १२ वेळा पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.यष्टिरक्षक फलंदाजाने पन्नासपेक्षा जास्त 12 खेळी केल्या आहेत.

याशिवाय, रोहित शर्मा कदिवसीय आशिया चषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयांच्या यादीत आघाडीवर आहे. या स्पर्धेत रोहित शर्माने आतापर्यंत २३ षटकार ठोकले आहेत. तर, भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने या स्पर्धेत एकूण १८ षटकार मारले. रोहित शर्मा पुढे पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आणि श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आहे. दोघांच्या नावावर अनुक्रमे २६ आणि २३ षटकारांची नोंद आहे.


सम्बन्धित सामग्री